सर्व कागदपत्रे डिजिटल पद्धतीने एक क्लिक वर आपल्या गावातील ग्रामपंचायतीमधील जे काही कागदपत्रे असतील ते काढायला आपल्याला आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जावा लागत होते. पण आता एक नवीन ॲप च्या माध्यमातून आपल्या गावातील ग्रामपंचायत मधील सर्व कागदपत्रे ही आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे.maha e gram citizen connect
त्यामुळे खाली दिलेली माहिती नीट वाचा आणि स्टेप बाय स्टेप माहिती घेऊन ग्रामपंचायत मधील कागदपत्रे तुम्ही घरबसल्या काढू शकता. आतापर्यंत असे होते की जन्मदाखला घरपट्टी पाणीपट्टी किंवा शेतीची काही सातबारा उतारे या सर्व कागदपत्रांची पडताळणी व काढण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत मध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या पण आता हे सर्व कागदपत्रे तुम्हाला एका क्लिकवर मिळतील.
maha e gram citizen connect
हे सर्व कागदपत्रे मोबाईलवर पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये एक ॲप घ्यायचा आहे प्रत्येक मोबाईल मध्ये प्ले स्टोर वर हे ॲप उपलब्ध आहे प्ले स्टोअरमधून महा इ ग्राम (maha e gram) त्या नावाने ॲप उपलब्ध आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये घ्या त्यानंतर ॲप ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला काही परमिशनस विचारतील त्या सर्व परमिशन द्या एक महत्त्वाची गोष्ट हे ॲप आपले सरकारच्या माध्यमातून चालविण्यात येत असल्या कारणाने हे ॲप आपल्या सर्वांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे व आपली माहिती देखील सुरक्षित आहे.
ॲप मधून परमिशन दिल्यानंतर तुम्हाला खाते तयार करायला तिथे विचारले जाईल त्यावर तुम्ही नवीन खाते यावर क्लिक करून आपली सर्व माहिती तिथे भरा.

माहिती ज्या पद्धतीने सांगितलेली आहे त्याच पद्धतीने योग्य माहिती भरा सुरुवातीला आपले नाव आडनाव त्यानंतर लिंग मोबाईल नंबर लोकेशन अशा गोष्टी विचारल्या जातील.
ही सर्व माहिती योग्य भरल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल एक नवीन आणि स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा त्यानंतर तुमचे अकाउंट तयार झाले त्यानंतर तुम्ही कधीही ॲप ओपन केल्याच्या नंतर युजरनेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर ॲप सुरू होईल.
या ॲप बद्दल कोणती कागदपत्र मिळतील व ती कागदपत्रे कशी मिळवायची याबाबत देखील माहिती खालील प्रमाणे आहे.
पासवर्ड टाकून ॲप सुरू झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका व आपले गाव निवडून आपली ग्रामपंचायत निवडायचे आहे ग्रामपंचायत निवडल्यानंतर ॲप यशस्वीरित्या सुरू होईल आणि तिथे कुठल्या गोष्टी कुठे आहेत maha e gram citizen connect
याबद्दल ॲप मधूनच तुम्हाला मदत केली जाईल त्या सर्व ठिकाणी तुम्हाला समजले हे पर्याय निवडायचे आहेत त्यानंतर तुमच्यासमोर सर्व गोष्टी दिसायला लागते जसे की जन्म दाखला जन्म नोंदणी दाखला मृत्यू दाखला किंवा कर प्रमाणपत्र वगैरे असे सर्व गोष्टी तुम्हाला समोर दिसायला लागतील त्यानंतर तुम्हाला जे कागदपत्र हवे आहे त्यावर क्लिक करून पुढे जायचे आहे उदाहरणार्थ आपण जन्म दाखला त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इतर काही पर्याय दिसतील.
कुठली कागदपत्रे तुम्हाला इथे काढता येतील.
- जन्म नोंदणीचा दाखला.
- विवाह नोंदणीचा दाखला.
- असोसमेंट उतार.
- दारिद्रय रेषे खालील दाखला.
- मृत्यू नोंदणीचा दाखला.
- घरपट्टी व पणीपट्टि
ही कागदपत्रे कशी काढावी याबद्दल?
तुम्हाला जो दाखला काढायचा आहे त्या दाखल्याचा पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला समोर एक मेसेज दिसेल त्यावर लिहिलेले असेल की जन्म नोंदणीचा दाखला उपलब्ध आहे हे जे दाखले आहे. ते 31 डिसेंबर 2015 पर्यंत असणार आहे.
त्यामुळे 2015 पर्यंतचे सर्व दाखले तुम्ही काढू शकणार आहात त्याचप्रमाणे तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र घरपट्टी पाणीपट्टी या प्रकारचे कागदपत्रे सहजरित्या मिळून जातील पण त्यासाठी तुमची ग्रामपंचायतला नोंद असणे आवश्यक आहे नोंद असेल तर हे ॲपच्या माध्यमातून तुम्ही आपल्या जिल्हा तालुका टाकल्याच्या नंतर मोबाईल नंबर वगैरे टाकून तुम्ही हवा तो दाखला पाहू शकता व डाउनलोड देखील करू शकता.
त्यानंतर तुम्ही घरपट्टी व पाणीपट्टी देखील हे ॲपच्या माध्यमातून भरणार आहात त्यासाठी तुम्हाला मिळकत क्रमांक मिळवायचा आहे तुम्ही तुमची ग्रामपंचायत टाकून जिल्हा तालुका टाकून व मिळकत क्रमांक टाकून घरपट्टी पाणीपट्टी देखील एका क्लिकवर भरू शकणार आहात. एवढेच नव्हे तर आपल्या ग्रामपंचायत च्या माध्यमातून कुठली कामे केलेली आहे हे देखील सर्व माहिती तुम्हाला दिसेल. अशा रीतीने तुम्हाला ग्रामपंचायत बद्दल सर्व माहिती आपल्या मोबाईलवर पाहता येईल.
त्यासोबतच बाजूला एक ऑप्शन दिलेला आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपले सरकार च्या माध्यमातून कोण कोणत्या सुविधा दिलेल्या जातात. त्याबाबत देखील सविस्तर माहिती व कोणत्या सुविधा आहेत त्या सुविधा देखील आपल्याला समोर दिसतात
या ज्या आपले सरकारच्या सुविधा आहेत या सुविधांचा आपल्याला लाभ मिळवायचा असेल तर त्याबाबत देखील माहिती व अर्ज करता येईल पण ही सुविधा सध्या सुरू आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही देखील सुविधा सुरू करण्यात येईल.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या ग्रामपंचायत बद्दल काही सूचना किंवा काही तक्रार असेल तर ती देखील तिथून मांडता येईल.
ही एक चांगली सुविधा आमच्या माध्यमातून दिलेली आहे त्यामुळे प्रत्येक जण आपले मत किंवा ग्रामपंचायत बद्दल असेल तक्रार मध्ये सबमिट करू शकतो.
हे ग्रामपंचायत वापरणे अगदी सोपे आहे. त्यामुळे आपल्या गावातील प्रत्येकाला वापरता येईल. तसेच आणखी काही सुविधा मिळणार आहे. परंतु त्यांना काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. पण सध्या तरी या सुविधा पुरेशा आहेत.
हे कागदपत्रे पाहताना किंवा काढण्यासाठी घ्यावयाची काळजी.
या ॲपवर ज्यावेळेस आपण कागदपत्रे काढतो त्यावेळेस ते डिजिटल स्वरूपात आपल्या मोबाईल मध्ये सेव होतात. आपले सरकारच्या माध्यमातून हे पूर्णपणे सुरक्षित आहे. पण जर तुमचा युजरनेम पासवर्ड इतर कोणालाही समजला तर तुम्ही ची कागदपत्रे सेव्ह केली आहेत ती इतरांना दिसते किंवा त्यांचा दुरुपयोग होईल त्यामुळे आपला पासवर्ड कोणालाही देऊ नये एवढी काळजी घ्यावी maha e gram citizen connect
या ॲपच्या माध्यमातून गावातील ग्रामपंचायत मध्ये फेऱ्या मारणे सोडा व आपल्या मोबाईल मध्येच आपले सर्व कागदपत्रे मिळवा व ही माहिती आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत व गावातील व्यक्तींना शेअर करा.
